आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा उपलब्ध:शहरात 11 वी प्रवेशासाठी 16,630 जागा उपलब्ध ; कनिष्ठ महाविद्यालयाचाही समावेश

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा अकरावीच्या ४०० जागा वाढवण्यात आल्या. सोबतच २ कनिष्ठ महाविद्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी शहरातील विविध ६३ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी १६ हजार २३० जागा होत्या. यंदा जागेत वाढ झाल्याने ६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १६ हजार ६३० जागेंसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. त्यांची प्रक्रिया ही शिक्षण उपसंचालक कार्यालयातून राबवली जाते. या वर्षीही प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. गेल्या वर्षी अमरावती शहरासाठी १६ हजार २३० जागा असून, त्यातील ५ हजार ८३६ जागा रिक्त होत्या. मात्र, यंदा त्यामध्ये बदल झाला आहे. यावर्षी अकरावीच्या ४०० जागा वाढल्या आहेत. त्याशिवाय २ कनिष्ठ महाविद्यालयांची ही वाढ झाली आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात अकरावीच्या आता १६ हजार ६३० जागा झाल्या आहेत. तसेच २ नव्याने कनिष्ठ महाविद्यालय वाढले असून त्याची संख्या ही ६५ झाली. गेल्या वर्षी कला शाखेच्या ३ हजार ५४०, वाणिज्य शाखा २ हजार ७४०, विज्ञान शाखेच्या ७ हजार ०२० तर एमसीव्हीसीच्या २९३० जागा होत्या तर यंदा कला शाखा १६०, विज्ञान शाखेच्या १६०, वाणिज्य शाखेच्या ८० जागा वाढल्या असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. यंदा अभियांत्रिकी करिता १२०० च्या जवळपास जागा : अमरावती जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन अमरावती, अचलपूर व डॉ पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती मिळून १२०० जागा आहेत. यामध्ये अनुविद्युत व दूरसंचार, यंत्र अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, आयटीया शाखेच्या १२०० जागा आहेत.

शाखानिहाय जागा कला ३७०० वाणिज्य २८२० विज्ञान ७१८० एमसीव्हीसी २९३० - वाढ ० एकूण १६६३०

बातम्या आणखी आहेत...