आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:शहरात अकरावी प्रवेशासाठी 16,330 जागा ; दोन कनिष्ठ महाविद्यालयेही वाढल्याने दिलासा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा अकरावीच्या ४०० जागा वाढवण्यात आल्या. सोबतच २ कनिष्ठ महाविद्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी शहरातील विविध ६३ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी १६ हजार २३० जागा होत्या. यंदा जागेत वाढ झाल्याने ६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १६ हजार ६३० जागेसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. त्यांची प्रक्रिया ही शिक्षण उपसंचालक कार्यालयातून राबवली जाते. या वर्षीही प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. गेल्या वर्षी अमरावती शहरासाठी १६ हजार २३० जागा असून, त्यातील ५ हजार ८३६ जागा रिक्त होत्या. मात्र, यंदा त्यामध्ये बदल झाला आहे. यावर्षी अकरावीच्या ४०० जागा वाढल्या आहेत. त्याशिवाय २ कनिष्ठ महाविद्यालयांची ही वाढ झाली आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात अकरावीच्या आता १६ हजार ६३० जागा झाल्या आहेत. तसेच २ नव्याने कनिष्ठ महाविद्यालय वाढले असून, त्याची संख्या ही ६५ झाली. गेल्या वर्षी कला शाखेच्या ३ हजार ५४०, वाणिज्य शाखा २ हजार ७४०, विज्ञान शाखेच्या ७ हजार ०२० तर एमसिव्हीसीच्या २९३० जागा होत्या तर यंदा कला शाखा १६०, विज्ञान शाखेच्या १६०, वाणिज्य शाखेच्या ८० जागा वाढल्या असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिये दरम्यान दहावीचा निकाल लागण्यापूर्वी अर्ज एक भरला जातो, तर दुसरा अर्ज हा निकाल लागल्यानंतर भरला जातो. त्यानुसार ३० मेपासून अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच प्रवेशासाठी केंद्राची व्यवस्था केली जाते.

बातम्या आणखी आहेत...