आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआध्रप्रदेशातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन दोन कार येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे दोन संशयित कारमधून १६८ किलो गांजा जप्त करण्यात एलसीबीला यश मिळाले. ही कारवाई एलसीबीने शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत केली. हा गांजा अचलपूर, चांदूर बाजार व नेरपिंगळाई परिसरात उतरवल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांसमोर आली आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्याची ही जिल्ह्यातील अलीकडची पहिलीच वेळ आहे
आश्लेष गजानन साठे (२५, रा. बिलानपुरा, अचलपूर), हरिष ऊर्फ शुभम अनिल मडावी (२४, रा. खिडकीगेट, अचलपूर), वसिम शहा गुड्डू शहा (२९, रा. नेरपिंगळाई, ता. मोर्शी), ओंकारसिंग ऊर्फ अंकुश गणेशसिंग चंदेल (२२, रा. फरमानपूरा, अचलपूर) आणि गजानन रमेश वानखडे (२८, रा. नेरपिंगळाई, मोर्शी) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी कारवाईसाठी तीन स्वतंत्र पथक तयार केले. हे पथक तिवसा ते मोर्शी मार्गावर विविध ठिकाणी सापळा रचून बसले होते. याच दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास या मार्गावरील सातरगावजवळ दोन संशयित कार पोलिसांना दिसल्या. या कार पोलिसांनी पकडल्या व तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल १६८ किलो गांजा असल्याचे समोर आले.
त्यामुळे पोलिसांनी या कारमधील पाच जणांना अटक करुन त्यांच्या ताब्यातील दोन कार व १६८ किलो गांजा असा २६ लाख ६० हजारांचा ऐवज जप्त केला.
२३ पोलिस, ६ तास कारवाई : एलसीबी पीआय तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात तिवसा ठाणेदार संदीप चव्हाण, एपीआय रामेश्वर धोंडगे, पीएसआय सूरज सुसतकर, नितीन चुलपार, एएसआय मुलचंद भांबुरकर, उर्वरित. पान ४
ग्रामीण पोलिसांनी २६ वेळा पकडला गांजा
ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात गांजाच्या २२ कारवाई केल्या आहेत. या २२ कारवाईंमधून गांजासह ६९ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच १ जानेवारी ते ३१ मे २०२२ पर्यंत ४ कारवाई केल्या आहेत. त्यामध्ये ८४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मागील दीड वर्षात एकूण २६ कारवाईमधून सुमारे ७० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मात्र, आज झालेल्या एकाच कारवाईत पोलिसांनी तब्बल २६ लाख ६० हजारांचा गांजा व ऐवज जप्त केला .
उत्तम कारवाईबद्दल रिवॉर्ड देण्यात येणार
‘एलसीबी’ने केलेली ही कारवाई उत्तम आहे. ही कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांना रिवॉर्ड देण्यात येणार आहे.
-अविनाश बारगळ,
पोलिस अधीक्षक.
वसीम शहा, आश्लेष साठे मुख्य सूत्रधार
पोलिसांनी पकडलेल्या पाच जणांमधील वसिम शहा व आश्लेष साठे हे मुख्य सूत्रधार आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गांजा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, ते हातात येत नव्हते शनिवारी त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. वसिम शहाविरुद्ध यापूर्वी गांजाच्या प्रकरणासह एकूण तीन गुन्हे दाखल आहे. वसिम हा नेरपिंगळाई परिसरात तर आश्लेश साठे हा अचलपूर, चांदूरबाजार भागात गांजा घेऊन जात असल्याची माहिती एलसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.