आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचा भीषण अपघात:तरुणासह 17 वर्षीय मुलगी जागीच ठार ; हायवेवर कोंडेश्वर टी-पाॅइंटवरील घटना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीकडून बडनेरा जाणाऱ्या एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात शहरातील एका अठरा वर्षीय तरुणासह सतरा वर्षीय मुलीचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. १९) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी- पॉइंटवर झाला आहे. या अपघातात कारचा पूर्णत: चुराडा झाला आहे.

आदित्य अखिलेंद्र विश्वकर्मा (१८, रा. शिवाजीनगर, अमरावती) आणि गौरी यशवंत शेळके (१७) असे अपघातात मृतांचे नावे आहेत. आदित्य हा शहरातील नरसम्मा महाविद्यालयाचा बारावीचा तर गौरी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेची अकराव्या वर्गातील विद्यार्थीनी होती. हे दोघेही शहरातील एकाच परिसरात राहत होते. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गौरीच्या वडिलांनी तिला घरुन महाविद्यालयात सोडून दिले होते. मात्र साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना गौरीचा बडनेराजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, गौरी व आदित्य कशासाठी बडनेरा भागात गेले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोघांनाही रक्तबंबाळ व गंभीर अवस्थेत इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तपासणीअंती दोघेही मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दोन्ही ब्रेकचा झाला इमर्जन्सी वापर : अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवर कोंडेश्वर टी पॉइंटजवळ एक नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी आदित्यची कार भरधाव होती. आदित्यला अचानक समोर ट्रक उभा असल्याचे दिसताच त्याने कचकचून ब्रेक आवरले तसेच हॅन्ड ब्रेक सुध्दा वापरला. एकाचवेळी दोन्ही ब्रेक मारल्यामुळे कार जागेवरच थांबून ट्रकवर जावून आदळली. यावेळी ट्रकमध्ये लोखंडी पाइप होते, त्या पाईपचा आणि कारचा मार लागल्यामुळे आदित्य व गौरी या दोघांनाही डोके, हात व शरीराच्या विवीध भागात जबर मार बसला व त्यांचा मृत्यू झाल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले आहे.

मृतक तरुणाविरुद्ध गुन्हा : या प्रकरणात गौरीच्या वडिलांनी बडनेरा ठाण्यात तक्रार दिली कि, मुलीला सकाळी कॉलेजमध्ये सोडून दिले होते. त्यानंतर आदित्यने तिला जबरीने कारमध्ये सोबत नेले व अपघात घडवून आणला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी मृत आदित्य विश्वकर्मा विरुद्ध अपहरण, अपघात घडवणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बडनेराचे ठाणेदार बाबाराव अवचार यांनी दिली.

मृतकांच्या नातेवाइकांमध्ये इर्विनमध्ये धक्काबुक्की आदित्य व मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहीती मिळताच दोघांच्याही नातेवाइकांनी इर्विनमध्ये गर्दी केली. यावेळी दोघांचेही मृतदेह पाहून नातेवाइक प्रचंड संतापले. तसेच आमच्या मुलीला मुलानेच कॉलेजमधून नेले व त्यामुळे तिचा अपघातात मृत्यू झाला असा आरोप करुन मुलीचे नातेवाइक अधिकच संतप्त झाले होते. या कारणावरून नातेवाइकांच्या दोन्ही गटात चांगलीच हमरीतुमरी व काही वेळानंतर धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी बडनेरा पोलिसांत तर मुलाच्या नातेवाइकांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...