आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वेक्स’मुळे पर्यावरणपुरक मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध:17 वर्षांपासून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या स्तुत्य उपक्रम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉलच्या शुभारंभप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल व व्हीएमव्हीच्या संचालक डॉ. अंजली देशमुख. मध्यभागी डॉ. जयंत वडतकर. - Divya Marathi
स्टॉलच्या शुभारंभप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल व व्हीएमव्हीच्या संचालक डॉ. अंजली देशमुख. मध्यभागी डॉ. जयंत वडतकर.

वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या (वेक्स) यावर्षीही “मातीचे गणपती बसवा निसर्गाशी बांधिलकी दाखवा” हा उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत मातीच्या मूर्ती घडवा कार्यशाळा, सादरीकरण व प्रदर्शनीच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली. त्याचवेळी जनजागृतीदरम्यान तयार झालेल्या मातीच्या गणेश मुर्ती नेहरु मैदानमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या मुर्तीच्या स्टॉलचे उद्घाटन आज (ता. 1) करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन पार पडले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष तथा विदर्भ महाविद्यालयाच्या संचालक डॉ. अंजली देशमुख, सचिव डॉ. जयंत वडतकर, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्रीकांत वऱ्हेकर, कार्यकारिणी सदस्य सौरभ जवंजाळ व मनीष ढाकुलकर तसेच अँड. राजमेहर निशाने, प्रा. अनंत वडतकर, प्रा. रवींद्र सरोदे, अरविंद कानस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

अमरावती शहरात पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती यासाठी वेक्स ही संस्था गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासुन होणारे प्रदुषण रोखण्यासाठी आणि याबाबत जनजागृती तसेच मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी सर्वप्रथम 2005 मध्ये संस्थेने पहिला प्रयत्न केला. तेव्हापासून तो अविरत सुरु आहे.

उद्घाटक बिजवल यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे जनमानसात पर्यावरण संवर्धनाचा विचार वाढीस लागला असून भाविक मातीच्या मूर्तींची मागणी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे हेच या उपक्रमाचे यश असल्याचे सचिव डॉ. जयंत वडतकर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमांतर्गत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ गजानन वाघ, सहसचिव डॉ. मंजुषा वाठ, किरण मोरे, डॉ रमेश चोंडेकर, डॉ. दीपलक्ष्मी कुलकर्णी, डॉ रिना लाहिरीया, प्रा. अर्चना इंगोले-उभाड, प्रा. गजेंद्र पचलोरे, प्रा. संजय रेड्डी यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित अंबुलकर, जगदेव ईवाने, श्रीलेश पडवळ, शुभम मानकर, अनुप तायवाडे, मोहित गावंडे, वैष्णवी फाळके, राज पांडे, कैवल्य नागले, आकांक्षा बुटले, पावन वैद्य, स्वाती माणिकपुरे, रितेश परतेती, संयोग दुर्गे, ज्ञानेश्वर कुऱ्हेकर, अभय भाले, अपूर्व गवळी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...