आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहन पुरस्कार:150 वर्षांची परंपरा असलेल्या तान्हा पोळ्यात 170 स्पर्धकांचा सहभाग

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी जुन्या अमरावतीतील १५० वर्षाच्या परंपरेसह संस्कृतीचे जतन करून यंदाही शनिवार, २७ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता तान्हा पोळा सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. यात सुमारे १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्वराली नांदुरकरने ११०१ रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला. मिताली खांडेकरने ७५१ रु.चा द्वितीय तर युवराज तांबस्करने ५५१ रु.चा तृतीय पुरस्कार मिळवला. समर्थ कारंजकर, ज्ञानेश्वर हरमकर, आराध्या डगवाळे, पद्मजा गुल्हाने यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. या वेळी तीन नशीबवान प्रेक्षकांनाही पुरस्कार मिळाले. सोन्याची नथ प्रीती खोब्रागडे यांनी, पैठणी साडी निर्मला साईसिकमल यांनी तर डिनर सेट रुपाली बेनी यांनी पटकावला. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषेत स्मिता बोंबलगे यांनी प्रथम, संगीता कांबळे यांनी दुसरा, तर मनीषा पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

परीक्षक म्हणून स्वाती बडगुजर, श्रद्धा गाणे यांनी काम बघितले. यादरम्यान काही सत्कारही घेण्यात आले. यात वसंत सावरकर, डॉ. रवी भूषण, चंदू सोजतिया, अॅड. शोएब वकील, नितीन कदम, राजेश वानखडे, महेंद्र भुतडा, डॉ. अब्रार, डॉ‌. संजय तीरथकर, डॉ. रणवीरसिंग राहल, शोएब खान यांना सामाजिक कार्य व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सन्मानित केले.

कार्यक्रमाला पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, नाना नागमोते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रीती बंड, महिला आघाडी शहर प्रमुख वर्षा भोयर, तालुका प्रमुख आशिष धर्माळे, उपजिल्हा प्रमुख डॉ. निर्मळ, माजी उपमहापौर राम सोळंके, युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे, माजी नगरसेवक अभिजित वडनेरे, नगरसेविका स्वाती निस्ताने, राजश्री जटाळे, कांचन ठाकूर, सारिका जयस्वाल उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाखा प्रवीण हरमकर यांनी केले. कार्यक्रमासाठी गोविंद दायमा, अनू पुरवार, राजू हेरे, निकेश शर्मा, आनंद राठी, शफी पैलवान, शकील नगमा, मुश्ताक व इतरांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...