आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:बेदम मारहाण करुन विहिरीत टाकल्याने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू; महिलेसह दोघांना अटक

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरातील मिलचाळ परिसरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला एका महिलेसह तिघांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याला विहिरीत टाकले. यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. १६) गुन्हा दाखल झाला आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशाल महेश हिवराळे (१८, रा. मिलचाळ, बडनेरा) असे मृत तरुणाचे तर मेहराज उल्लाखान हिदायत उल्ला खान (२८) याच्यासह एक २६ वर्षीय महिला या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोन अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशालचे आरोपी असलेल्या २६ वर्षीय महिलेसोबत मागील वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधावरून मेहराज हा नेहमीच विशालला हटकत होता. त्या महिलेकडे तू यायचे नाही, असे नेहमीच मेहराज विशालला सांगत होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच मेहराजने विशालला मारण्याची धमकीसुद्धा दिली होती.

दरम्यान, बुधवारी (दि. १६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विशाल त्या महिलेच्या घरी गेला. त्यानंतर रात्री सव्वा अकरा ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान मेहराज व त्याचे दोन अनोळखी मित्र तसेच ही २६ वर्षीय महिला या चौघांनी संगनमत करून विशालला मारहाण केली व पाच बंगला परिसरातील एका विहिरीत फेकून दिले. यातच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृत विशालचा भाऊ विष्णू महेश हिवराळे (२१) याने बडनेरा पोलिस ठाण्यात दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. बडनेरा पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...