आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता कर्मचारी:मनपाच्या रेकॉर्डवर 1800 स्वच्छता कर्मचारी; प्रत्यक्षात कामावर निम्मेच

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सहा महिन्यांपासून मनपा प्रशासन निरंकुश पणे वागत असून, शहरात एकिकडे विकासकामांचा जोर सुरू असतानाच सर्वसामान्यांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शहरात मनपाच्या रेकॉर्डवर १८०० स्वच्छता कर्मचारी असताना प्रत्यक्षात निम्मेच असल्याचे दिसून येते याकडे लक्ष वेधून स्वच्छतेच्या एकूणच कामांचा ‘कचरा’ झाला आहे. अगदी आमदारांच्या घरा पुढील कचराही स्वच्छ केला जात नाही. हा बेजबाबदारपणाचा कळस असल्याचे खडे बोल आ. प्रवीण पोटे यांनी गुरुवार,दि. २२ रोजी दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाला सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता पंधरवडा पाळला जात असतानाही अमरावतीचा चांगला ‘उद्धार’ केला जात असल्याची कोपरखळीही त्यांनी लगावली.

स्वच्छता कंत्राटदारांवर मनपातील कोणत्याही अधिकाऱ्याचा वचकच राहिला नाही. सध्या नगरसेवक माजी झाल्यामुळे त्यांचे कोणीही ऐकत नाही. शहरातील रस्ते, नाल्यांमध्ये कचरा व घाण दिसत असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा उचलणारे ४५ ट्रक असून त्यात ३० ट्रक व १५ डंपर आहेत. ते २२५ फेऱ्या रोज करतात असे स्वच्छता विभाग सांगतो हे पटण्यासारखे नाही. या कंत्राटदाराला महिन्याला ६० ते ६५ लाख बिल दिले जाते. तरी सर्वत्र कचरा दिसतो. मनपा आयुक्तांनी याची दखल घेत तत्काळ मनपाच्या कामकाजात सुधारणा कराव्यात, अन्यथा कोणाचेही काही ऐकून घेणार नाही, असा इशाराही आमदार पोटे यांनी दिला. सुरेखा लुंगारे, पंचफुला चव्हाण, वंदना मडघे, पद्मजा कौंडण्य, राधा कुरील, रिता मोकलकर, राजेश साहू, रेखा भुतडा, सुनंदा खरड, स्वाती कुळकर्णी, माधुरी ठाकरे, माजी महापौर चेतन गावंडे, संजय नरवणे, सुनील काळे, राजेश साहू, आशिष अतकरे,

सफाईच्या कामात आठवड्यात सुधारणा : आयुक्त
सफाईत त्रुटी हे मान्य आहे. एका आठवड्यात यात सुधारणा करणार. हाॅटेल वेस्ट मॅनेजमेंटसाठी लवकरच निविदा काढणार असून ट्रकची व्यवस्था, फाॅगिंग मशीनची दुरुस्ती, झाडांची कापणी झाल्यानंतर त्यांची उचल, घंटागाड्यांची दुरुस्ती, गाड्या पुरविल्या जातात की नाही, २३ कचरा कंत्राटदारांकडून ठरलेले काम होते की नाही, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. सहायक आयुक्तांवर प्रभागातील सफाईची जबाबदारी असून त्यांनी प्रत्यक्ष भेटीचे जीटो टॅग फोटो व सेल्फी मला पाठवावी. कारवाई प्रत्यक्ष दिसली पाहीजे. सतत दंड केल्यानंतरही काम करीत नसेल तर कंत्राटदारच बदलला जाइंल, अशी हमी मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

कंत्राटदारांची बाजू का घेता? : आ. पोटे
कंत्राटदारांची मनपा प्रशासन बाजू का घेते तेच कळत नाही. जर काम करीत नसतील तर दंड करावा. कठोर कारवाई करावी. कंत्राटदाराला एका महिन्यात ६० लाखाचे बिल दिले जाते. मात्र दंड केवळ नाममात्र १ हजार रु. आकारला जातो. याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तकलादू कारवाई नकाे, तर ठोस कारवाई हवी. कामात कुचराई करीत असताना त्याला तत्काळ देयक दिले जाते. मात्र इलेक्ट्रीक बिल भरले जात नाही. एवढे नव्हे तर ५० हजार रु. इतर कंत्राटदारांचे अडवले जातात. सिस्टिम मॅनेजरकडे उद्यानाची जबाबदारी का देण्यात आली, अशा शब्दांत आ. पोटे यांनी खडसावले

बातम्या आणखी आहेत...