आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीची रणधुमाळी:तिवसा तालुक्यात 3 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 19 नामांकन अर्ज दाखल

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात 18 सप्टेंबर रोजी चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होवू घातल्या असून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेला आखतवाडा ग्रापपंचायतीमधून सरपंच पदासाठी एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने हे पद रिक्त राहिले आहे.

तर उर्वरित उंबरखेड, घोटा, कवाडगव्हाण ग्रामपंचायतींचे थेट सरपंच पदाच्या तीन जागांसाठी एकूण 19 नामांकन पत्र दाखल झाले आहे. त्यामध्ये उंबरखेड ग्रामपंचायतीमधून सर्वाधिक 11 नामांकन पत्र दाखल झाले आहेत. त्यानंतर कवाडगव्हाण ग्रा. पं. मधून पाच, तर घोटा ग्रामपंचायतीमधून 3 उमेदवारी अर्ज सरपंच पदासाठी प्राप्त झाले आहेत.

तिवसा तालुक्यातील घोटा ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी राखीव आहे. तेथील सरपंच पदासाठी तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये जया मनोज गहुकार, गीता अनिल चव्हाण व रुपाली जगजीवन राऊत यांचा समावेश आहे. याशिवाय कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. तेथे एकूण पाच महिलांनी सरपंच पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये मोहिनी दिलीप चौधरी, प्रिती गजानन वसू, ज्योती रमेश सोमवंशी, जया विनोद चौधरी व मनीषा संदीप चौधरी यांचा समावेश आहे.

उंबरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तेथे सरपंच पदासाठी सर्वाधिक 11 नामांकन पत्र दाखल झाले आहे. त्यामध्ये अतुल दिवाकर कळंबे, सोपान सुरेश फाले, नरेंद्र विनायक अळसपुरे, दीपाली नितीन कळंबे, नितीन बाबुराव कळंबे, किशोर सुधाकर पांडव, मंगेश कालिदासराव पावडे, गजानन अंबादासराव अळसपुरे, रितेश मारोतराव पांडव, उमेश शिवदास विघ्ने व गोपाल शंकरराव अळसपुरे यांचा समावेश आहे.

मंगळवारी (दि. 6) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज माघारी घेतात व किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर सरपंच व सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणूक रणधुमाळीला वेग येईल, हे मात्र निश्चित.

बातम्या आणखी आहेत...