आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र:पीएम किसान योजनेतील‎ 19 हजार लाभार्थी अपात्र‎

अमरावती‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या शेतकरी खातेदारांनी पीएम‎ किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी‎ केली व आतापर्यंत १२ हप्त्याचा‎ लाभ घेतला, यापैकी तब्बल १९‎ हजार शेतकऱ्यांच्या शेतीचा पत्ता‎ अद्याप महसूल विभागाला‎ लागलेला नाही. त्यामुळे हे खातेदार‎ आता योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या‎ लाभासाठी अपात्र ठरले आहेत.‎ पंतप्रधान किसान सन्मान योजनेत‎ दर चार महिन्यांनी दोन हजारांचा‎ लाभ पात्र खातेदाराला देण्यात येतो.‎

योजनेत अपात्र शेतकऱ्यांनी लाभ‎ घेतल्याचे निदर्शनास येताच महसूल‎ विभागाद्वारा सर्वच खातेदारांची‎ पडताळणी करण्यात येऊन त्यांच्या‎ शेतीविषयक नोंदी पोर्टलवर घेतल्या‎ जात आहेत. त्यामुळे एकाच‎ कुटुंबातील अनेकांना लाभ मिळत‎ होता. हे आता बंद झाले आहे.‎ याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जवळ‎ शेती नाही, अशाही काही‎ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, हे‎ आता निदर्शनास आल्याने त्यांना‎ लाभ मिळणे या हप्त्यापासून बंद‎ झाले आहे. या योजनेद्वारे सन २०१९‎ पासून नोंदणी केलेल्या शेतकरी‎ खातेदाराला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये‎ प्रत्येकी सहा हजारांचा लाभ दिल्या‎ जातो. ३.३९ लाख खातेदारांनी या‎ योजनेसाठी नोंदणी केली होती. या‎ खातेदारांची शेतीविषयक माहिती‎ आता महसूल विभागाच्या क्षेत्रीय‎ यंत्रणेद्वारा नोंदवल्या जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...