आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेव खोरीलगत आढळले बिबट्याचे 2 बछडे:वनविभागाने घेतले ताब्यात; 7 ते 8 महिने वय, ताब्यात घेतलेल्यांत एक नर, दुसरी मादी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगत असलेल्या महादेवखोरी परिसरातील वनविभागाच्या भागात गुरूवारी (ता. 1) सकाळी बिबट्याची दोन बछडे (पिल्लं) आढळली. ही माहीती वनविभागाच्या पथकाला मिळताच पथकाने घटनास्थळी जावून दोन्ही पिलांना ताब्यात घेवून वडाळी परिसरातील रेस्क्यू केंद्रात आणले. यावेळी एक्सप्रेस हायवेलगत पुलावर बछड्यांना पाहण्यासाठी नागरीकांची प्रचंड गर्दी झाली होती.

महादेवखाेरी तसेच वडाळीलगतच्या नागरी वस्तीत यापुर्वी नागरीकांना बिबट दर्शन झालेले आहेत. दरम्यान गुरूवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एक्सप्रेस हायवेवर असलेल्या पुलालगत वनविभागाने त्यांच्याच जागेत वृक्षारोपण केले आहेत. या झाडांमध्ये बिबटची दोन बछडे (पिल्लं) असल्याचे नागरीकांना दिसले. त्यांनी तत्काळ ही माहीती वनविभागाच्या पथकाला दिली. त्यामुळे वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचले व त्यांनी पिल्लांच्या आजूबाजूने पाहणी केली मात्र मोठा बिबट नसल्याचे दिसले.

यानंतर रेस्क्यू पथकाने दोन्ही पिल्लांना ताब्यात घेवून वडाळी येथे वनविभागाच्या रेस्क्यू सेंटरला आणले आहे. हे दोन्ही पिल्लं ठणठणीत असून त्यांना काही दिवसातच नैसर्गीक अधिवासात सोडण्यात येणार आहे. सापडलेल्या दोन्ही पिल्लांचे वय अंदाजे ७ ते ८ महिने असून दाेनपैकी एक नर व एक मादी असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान हे बछडे असल्याची माहीती मिळताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे पोलिससुध्दा घटनास्थळी पोहचले होते.

मोठ्या बिबटपासून झाली असावी ताटातूट

या परिसरात मोठ्या आकाराचे बिबट आहेत. दरम्यान मादी बिबटसोबत असतानाच ती समोर गेली असावी व हे दोन बछडे मागे राहीले, त्यामुळेच त्यांची ताटातूट झाली असावी, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सोडणार नैसर्गिक अधिवासात

दोन्ही बछड्यांना वडाळीच्या रेस्कू सेंटरमध्ये ठेवले आहे. या बछड्यांची पशूवैद्यकिय तज्ज्ञांकडून तपासणी करुन घेतली असून ते ठणठणीत असल्याचा अहवालसुध्दा त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाला आहे. या प्रकरणी वरीष्ठांकडून परवानगी प्राप्त होताच दोन्ही बछड्यांना नैसर्गीक अधिवासात सोडण्यात येईल.

- वर्षा हरणे, आरएफओ वडाळी.

बातम्या आणखी आहेत...