आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागा बॅरेज परिसरात दरोडा:सुरक्षा रक्षकांना मारहाण, डांबून ठेवत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

दर्यापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सांगवा परिसरातील चंद्रभागा बॅरेज प्रकल्पावर बुधवार ते गुरुवारी (दि. १५) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुरक्षा रक्षकास मारहाण करुन खोलीत डांबले. यावेळी दरोडेखोरांनी प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या डीपीमधून कॉपर क्वॉईल तसेच अन्य साहित्य असा सुमारे १ लाख ७७ हजार ६६० रुपयांचे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री चंद्रभागा बॅरेज प्रकल्पावर गणेश डाखोडे व कैलास पारीसे हे पहारा देत असताना मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून ५ ते ६ अज्ञात दरोडेखोरांनी बॅरेज प्रकल्पावर अचानक प्रवेश केला.

१० दिवसात दुसरा दरोडा अंजनगाव सुर्जी येथे ४ डिसेंबरला एका व्यापाऱ्याच्या गोदामात दरोडेखोर शिरले होते. त्यांनी व्यापाऱ्याला गंभीर मारहाण करुन ४ लाखांची रोख लंपास केली. या प्रकरणात पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली आहे. मात्र काही दरोडेखोर फरार असतानाच, १४ ते १५ डिसेंबरच्या मध्यरात्री चंद्रभागा बॅरेज परिसरात सुरक्षा रक्षकांना मारहाण करत साहित्य लंपास केले. दहा दिवसांच्या अंतरात जिल्ह्यात दरोड्याच्या दोन घटना घडणे हे गंभीर आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या रात्र-गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...