आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा सुनावली:वाहतूक पोलिसाला खाली पाडून धमकी देणाऱ्याला 2 वर्षे कारावास

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रिपल सीट जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला थांबवून दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांसोबत दुचाकीस्वाराने वाद घातला. त्यावेळी पोलिसाला खाली पाडून दुचाकीस्वाराने जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार आठ वर्षांपूर्वी घडला होता. या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीला येथील जिल्हा न्यायालय (क्रमांक ३) चे न्यायाधीश आर. व्ही.ताम्हणेकर यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने बुधवारी (दि. २१) दिला आहे.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर शेख बब्बू (३०, रा. कसाबपुरा, वलगांव, ता. जि. अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १९ डिसेंबर २०१४ रोजी शहरातील गांधी चौक परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी तत्कालीन वाहतूक पोलिस अंमलदार मधुकर पांडुजी गवई कर्तव्यावर हजर होते.

यावेळी त्यांना एका दुचाकीवरून तीन व्यक्ती जात असल्याचे दिसले. त्यांनी त्या दुचाकीला अडवले असता त्यातील एकाने त्याचे नाव शेख समीर शेख बब्बू असल्याचे सांगितले. या व्यक्तीस कागदपत्रे व परवाना मागण्यात आला. परंतु कागदपत्रे न दाखवता तो पळून जाण्याच्या बेतात होता. यावेळी मधुकर गवई यांनी त्यास पकडले. परंतु त्याने गवई यांच्याशी झटापट करुन खाली पाडले. यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली.

बातम्या आणखी आहेत...