आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:वडाळी, छत्री तलाव विकासासाठी केंद्राकडून 20 कोटींचा निधी मंजूर

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जलस्रोतांचे वैभव अशी ओळख असलेल्या वडाळी व छत्री तलावाच्या विकासाकरिता केंद्र शासनाने २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. खा. नवनीत राणा यांनी केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी निधी मंजूर केला. त्यामुळे ब्रिटिशकालीन वडाळी व छत्री तलावाच्या विकासाला चालना मिळणार असून तलाव स्वच्छता, सौंदर्यीकरण, जलस्रोत पुनर्जीवन व पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून वडाळी व छत्री तलावाचा कायापालट लवकरच होणार असल्याचे खा. राणा म्हणाल्या.

केंद्रीय गृहनिर्माण व अर्बन विकास मंत्रालयाद्वारे खासदारांनी प्रस्तावित केलेला छत्री व वडाळी तलाव विकास आराखडा हा अटल मिशन फॉर रिजूविनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफर्मेशन-अमृत २.० योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला असून, महाराष्ट्र स्वॅपनुसार याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे या विभागाच्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...