आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषमता:दिवस-रात्रीच्या तापमानामध्ये 20 अंशांचा फरक; आरोग्यास त्रासदायी

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून दुपारच्या‎ सुमारास उन्हाची दाहकता तर रात्रीच्या‎ वेळी मात्र गारवा जाणवत आहे.‎ रविवारी रात्रीचे किमान तापमान १२.४‎ अंश तर दुपारचे कमाल तापमान तब्बल‎ ३२.८ अंश होते. दोन तापमानातील‎ फरक २०.४ अंशांपेक्षा अधिक आहे.‎ वातावरणातील हा बदलाचा लंपडाव‎ मानवी आरोग्यासाठी त्रासदायक तर‎ पिकांसाठी घातक ठरत आहे.‎ डिसेंबर व जानेवारी महिन्यात‎ काही दिवस पारा चांगलाच खाली‎ होता. त्यामुळे आठ ते दहा दिवस थंडी‎ जाणवली होती. त्यानंतर मात्र रात्रीच्या‎ वेळी पारा १५ ते १६ अंशांवर गेला‎ होता. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती.‎ परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून‎ पुन्हा एकदा रात्रीला थंडी जाणवत‎ आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड‎ वाऱ्यांमुळे थंडी वाढली आहे. २ व ३‎ फेब्रुवारीला तर किमान तापमान १०.५‎ अंशांपर्यंत खाली आले होते. आता‎ रात्रीच्या वातावरणात थोडी वाढ‎ झाली आहे, परंतु ते १२ अंशांपर्यंतच‎ आहे.

आता चार दिवस किमान‎ तापमानात थोडी वाढ होणार‎ श्वसनाशी संबंधित आजार असलेल्यांना त्रास‎ तापमानातील मोठ्या फरकामुळे ज्या रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजार‎ आहे, त्यांचा त्रास वाढतो. जसे दमा, तसेच ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे.‎ त्यांच्या त्रासात आणखी वाढ होते. सोबतच विषाणू संसर्गही वाढतो.‎ - डाॅ‌. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.‎

सर्दी, ताप, खोकल्याचे‎ रुग्ण वाढतात‎ विषम तापमान हे लहान बाळांसह‎ ज्येष्ठ नागरिक व सर्वांच्या‎ आरोग्यासाठी घातक आहे. यात‎ मोठ्या प्रमाणात विषाणू संसर्गाचा‎ त्रास होतो. सर्दी, ताप, खोकल्याचे‎ रुग्ण वाढतात. या काळात काळजी‎ घेण्याची गरज आहे.‎ - डाॅ. दिलीप सौंदळे, जिल्हा‎ शल्यचिकित्सक.‎

बातम्या आणखी आहेत...