आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटपाल कार्यालयाने टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित येऊन अपघात विमा योजना आणली आहे. या दोन्ही योजना मिळून ७९५ रुपयांचा प्रीमिअम भरून टपाल विभागाकडून हा अपघात विमा उतरवण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ८४४ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यातील सात ते आठ लाभार्थ्यांना किरकोळ अपघातानंतर उपचारासाठी विम्याचा लाभ मिळाला असल्याची माहिती डाक विभागाकडून देण्यात आली. अचानक अपघात झाल्यावर एखाद्या व्यक्तीवर अथवा त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. शरीराची हानी तर होतेच, शिवाय उपचाराचा खर्च कोठून करायचा असा प्रश्नही उभा राहतो. यासाठी टपाल खात्याने कमी पैशांत टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना आणली आहे.
यामध्ये यामध्ये टाटा एआयजी ३९९ रुपये आणि बजाज अलायन्स ३९६ रुपये असा एकूण ७९५ रुपयांत हा विमा काढण्यात येत आहे. वर्षाला ७९५ रुपयांचा हप्ता भरून टपाल विभागाकडून हा विमा उतरवण्यात येतो. दरवर्षी विमा रिन्यूअल करणे गरजेचे आहे. अपघात घडल्यानंतर वैद्यकीय खर्चासाठी खर्चाच्या बिलासोबत विमा कंपनीकडे अर्ज करावा लागतो. रुग्णालयाचा संपूर्ण लेखी तपशील मूळ कागदपत्रांसह विमा कंपनीला सुपूर्द करावा लागतो. जिल्ह्यात टपाल विभागाकडे आतापर्यंत १९ हजार ८४४ नागरिकांनी अपघाती विमा काढला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही टपाल कार्यालयातून विमा काढता येऊ शकतो.
अपघात विमा योजनेचा लाभ कसा घ्याल टपाल विभागाकडून विमा काढलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास टाटा एआयजी व बजाज अलायन्स या दोन्ही कंपनीकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा विमा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिला जातो. तसेच व्यक्तीला अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा एक हात, एक पायही गमवावा लागला असेल तरीही दोन्ही कंपनीकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा लाभ दिला जातो.
नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा टपाल विभागामार्फत दुर्गम भागात पोस्टमन आपली सेवा देतात. त्याच प्रकारे आता अतिदुर्गम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी टपाल विभाग अपघाती विमा योजना घेऊन आला आहे. अगदी माफक दरात ही अपघात योजना आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजारच्या वर नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. -वसुंधरा गुल्हाने, प्रवर डाक अधीक्षक. आवश्यक कागदपत्रे या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. पेपरलेस पद्धतीने विम्याचा फॉर्म भरून घेतला जातो. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवावे लागतात. तसेच नॉमिनीचे पूर्ण नाव, जन्मतारीख व व्हॅलिड ई- मेल आयडी आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.