आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात २१ कि.मी. राज्यस्तरीय अर्ध मॅरेथॉन अटल दौड शर्यतीचे येत्या २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी तुषार भारतीय मित्र मंडळाद्वारे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनमध्ये राज्यातून चारही गटात किमान २ हजार धावक सहभागी होणार आहेत. विद्यार्थी, युवकांमध्ये धावण्याची आरोग्यदायी सवय निर्माण व्हावी, तसेच आरोग्यम् धनसंपदा श्लोकानुसार आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती, असल्याची जाण व्हावी, या उद्देशाने अर्ध मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनला राजकमल चौकातील नेहरू मैदानातून सुरुवात होणार असल्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आयोजन समितीने मैदानाची पाहणी करून तेथे स्वच्छता, मोबाइल टाॅयलेट, पाण्याची व्यवस्था व पंडालबाबत संबंधितांना सुचना दिल्या. या स्पर्धेत ३ लाख ५० हजारावर रोख पुरस्कार दिले जाणार असल्यामुळे उदयोन्मुख धावक, नामांकित धावकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रचार प्रसार कार्यालयाचे उद्घाटन : अर्ध मॅरेथॉन अटल दौड स्पर्धेसाठी धावकांना नाव नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबद्दल माहिती मिळावी, यासाठी श्री वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या बाजूला गोखले बंधू जवळ राजकमल चौक अमरावती येथे मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हाफ आयर्न मॅन डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, अतुल कळमकर सोबतच गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भारतीय, आ. डॉ. रणजीत पाटील, भाजपा अमरावती अध्यक्ष किरण पातुरकर, प्रा. रवी खांडेकर, माजी महापौर चेतन गावंडे , संजय नरवणे , गोपाळ चांडक, अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघाचे सचिव अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी अतुल कळमकर हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा पहिला अर्ज देण्यात आला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश अर्जवाटप, त्यांची स्वीकृती, अर्जांची छाननी, स्पर्धकांना चेस्ट नंबरचे वाटप, स्पर्धेपूर्वी बैठका अशी मॅरेथॉनशी निगडीत असलेली विविध कामे या कार्यालयातून होणार आहे. गोवा येथे नुकतंच पार पाडलेली हाफ आयर्न मॅन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले अतुल कळमकर आणि लक्ष्मीकांत खंडागळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
समाजाच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर विचार सकारात्मक राहतात आणि समाज म्हणून आपला खऱ्या अर्थाने विकास होतो अशी भुमिका मॅरेथॉन अटल दोष स्पर्धेच्या आयोजना मागील असल्याचे आयोजक तुषार भारतीय यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.