आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेराजवळील पाळा येथील वसुधाताई देशमुख फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बीटेक तृतीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. महाविद्यालयाचे शुल्क भरले नसल्यामुळे परीक्षेदरम्यान त्याचा पेपर हिसकावून घेतला व त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालयावर केला आहे. अनिकेत अशोकराव निरगुळकर (२१, रा. रिधोरा, राळेगाव, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. अनिकेत शहरात अनुराधा कॉलनीमध्ये भाड्याची खोली करून राहत होता. गुरुवारी मिड टर्म परीक्षेमधील ‘क्वालिटी कंट्रोल’ विषयाचा अनिकेतचा पेपर होता. त्याचे १७ हजार रुपये भरणे बाकी होते त्यामुळेच परीक्षा सुरू असताना अनिकेतचा पेपर एका प्राध्यापिकेने हिसकावून घेतला. ही बाब त्याने फोनद्वारे मला सांगितली होती. त्या वेळी त्याला मी सांगितले की, उद्या आपण फीचे पैसे भरू. मात्र, रात्री दहा वाजेच्या सुमारास बडनेरा पोलिसांचा ‘तुमच्या मुलाने आत्महत्या केली’ असा निरोप मिळाला. पेपर हिसकावल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप अनिकेतच्या वडिलांनी केला.
रेल्वेतून उडी घेत छत्तीसगडच्या तरुणींची आत्महत्या
अकोला - छत्तीसगडमधील दोन तरुणींनी अकोला जिल्ह्यातील गायगावनजीक मनारखेड चौकी परिसरात बुधवारी रात्री मुंबई-हावडा रेल्वेतून पाठोपाठ उडी घेत आत्महत्या केली. दोघीही सख्ख्या मावस बहिणी असल्याची ओळख गुरुवारी पटली. अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात दोन तरुणींचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळले. कुमारी बेबी राजपूत (१९) आणि कुमारी पूजा गिरी (१९, दोघीही रा. चापा, जि. जांगीर, छत्तीसगड) अशी त्यांची नावे आहेत. या तरुणींनी चार दिवसांपूर्वी आयटीआयला जात असल्याचे सांगून घर सोडले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.