आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:35 वर्षीय महिलेसोबत 21 वर्षीय‎ तरुण ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये; पिडीतेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा‎

अमरावती3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ अंदाजे ३५ वर्ष वय असलेली एक‎ महिला तिच्या पतीपासून विभक्त राहत‎ होती. तिला पतीपासून दोन मुलंसुद्धा‎ आहेत. दरम्यान, मागील सहा‎ महिन्यांपासून ती मुळचा‎ उत्तरप्रदेशातील असलेल्या एका २१‎ वर्षीय तरुणासोबत शहरात ‘लिव्ह इन‎ रिलेशनशीप’मध्ये राहत होती.

या‎ काळात त्याने वारंवार अत्याचार‎ केल्याचा पिडीतेचा आरोप आहे.‎ यातून तीला ३ महिन्यांची गर्भधारणा‎ झाली. दरम्यान, आता तो तरुण पिडीत‎ महिलेचा विश्वासघात करुन निघून‎ गेला. या प्रकरणी पिडीतेच्या‎ तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी‎ बुधवारी (दि. २४) तरुणाविरुद्ध‎ बलात्कार तसेच विश्वासघात‎ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.‎

आदित्यसिंह ठाकूर (२१, रा.‎ बरकतपूर, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश)‎ असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे‎ नाव आहे. आदित्यसिंग आणि पिडीत‎ महिलेची सुमारे आठ ते नऊ‎ महिन्यांपूर्वी शहरात ओळख झाली. तो‎ शहरात मजुरीचे काम करण्यासाठी‎ वास्तव्यास होता. दरम्यान, त्यांच्यातील‎ ओळखीमुळे ते एकमेकांसोबत राहू‎ लागले. सुमारे ६ महिने ते एकत्र राहीले.‎

मात्र काही दिवसांपूर्वी तो अचानक‎ महिलेला काहीही न सांगता परस्पर‎ त्याच्या गावी उत्तर प्रदेशात निघून गेला.‎ पिडीतेने त्याला संपर्क साधण्याचा‎ प्रयत्न केला असता त्याने फोन‎ उचलला नाही. त्यामुळे महिलेने‎ आदित्यसिंहच्या वडिलांशी संपर्क‎ साधला. मात्र तो गावी पोहोचला नसून,‎ त्याच्याबाबत आम्हाला काहीच माहित‎ नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,‎ आदित्यसिंहने केलेल्या अत्याचारामुळे‎ आपण गर्भवती असून तों विश्वासघात‎ करुन निघून गेला, असे पिडीतेने‎ पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.‎ त्यामुळे पोलिसांनी आदित्यसिंग ठाकूर‎ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला‎ असल्याची महिती राजापेठचे ठाणेदार‎ मनिष ठाकरे यांनी दिली.‎