आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:आठ महिन्यांमध्ये जिल्ह्यात आढळले नवे 219 एचआयव्ही संक्रमित रुग्ण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनस्तरावरून मागील अनेक वर्षांपासून समाजात मोठया प्रमाणात जनजागृती केली जात असताना जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत नवे २१९ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी तब्बल ७५ टक्के रुग्ण हे २५ ते ५० वयोगटातील आहेत. एकिकडे सातत्याने एचआयव्ही बाधितांच्या संख्येत घट होत असली तरी नवे एचआयव्ही संक्रमित रुग्ण कमी करण्याचे आव्हान हे आरोग्य विभागापुढे आहे. नवीन एचआयव्ही बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमुख कारण असुरक्षित शारीरिक संबंध असल्याचे जिल्हा एड्स प्रतिबंधक कार्यालयाव्दारे सांगण्यात आले आहे.

दुषित सिरीज किंवा निडल शरीरात गेल्यामुळे होणारे संक्रमण. एड्स जनजागृतीसाठी स्थानिक पातळीवर जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय तसेच वैद्यकिय यंत्रणेकडून सातत्याने एचआयव्हीपासून बचावाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या आठ महिन्यात जिल्ह्यात १ लाख २६ हजार ८०० जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४३ हजार ९०३ पुरूषांची तपासणी केली असता १३८ संक्रमित आढळले. याचवेळी ३५ हजार ९३० महिलांची तपासणी केली असता ८१ संक्रमित आहे. अशी एकूण नवे २१९ एचआयव्ही संक्रमित आढळले आहेत. याच काळात ५९ हजार ६४० गरोदर स्त्रियांची एचआयव्ही तपासणी केली असता त्यामध्ये ६ पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाव्दारे मिळाली आहे.

जिल्ह्यात ६८७६ एचआयव्हीबाधित जिल्ह्यात सद्यास्थितीत एकूण ६ हजार ८७६ एचआयव्ही बाधित असून त्यापैकी ३ हजार ९८८ पुरुष आणि २८६२ स्त्रियांचा समावेश आहे. ६ हजार ४२ रुग्णांना औषधोपचार सुरू केले होते. सद्या ३ हजार ८३९ रुग्ण नियमित औषधोपचार घेत आहेत. औषधोपचार न घेणाऱ्या २ हजार २०३ रुग्णांमध्ये अनेकांनी जिल्हा सोडून इतरत्र उपचार सुरू केले, त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर काहींनी औषधोपचार घेणे बंद केले आहे.

रक्त, सिरीज, निडलद्वारे संक्रमण अत्यल्प जिल्ह्यात आतापर्यंत दुषित रक्त, सिरीज किंवा निडलद्वारे संक्रमण झाल्याची नोंद नसल्याचे जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कार्यालयाकडून सांगण्यात आले. याचवेळी एचआयव्ही संक्रमित गरोदर मातेकडूनही बाळाला लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प असून मागील दोन वर्षात नव्याने संक्रमण झालेल्यांमध्ये असे एकही बालक आढळले नाही. त्यामुळे सर्वाधिक म्हणजेच जिल्ह्याचा विचार करता ९८ टक्क्यांपेक्षा अधिक धोका केवळ असुरक्षित शारीरिक संबंधामुळेच असल्याचे दिसते.

शहरात लवकरच दुसरे एआरटी केंद्र एचआयव्ही बाधितांची टक्केवारी दरवर्षी कमी होत आहे. मात्र नवे रुग्ण समोर येत आहेत. एचआयव्हीबाधितांना समुपदेशन करण्यासाठी इर्विनमध्ये एआरटी केंद्र असून लवकरच पीडीएमसीलाही एआरटी केंद्र सुरू होणार आहे. बाधितांना नियमित औषधोपचार मिळावे म्हणून जिल्ह्यात आठ लिंक एआरटी केंद्र सुध्दा आहेत. एचआयव्हीला थांबवण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती सुरू आहे. अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष.

बातम्या आणखी आहेत...