आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजावणार हक्क:मोर्शी तालुक्यात 24 ग्रा. पं.मध्ये 31, 359 मतदार बजावणार हक्क

शिरखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी तालुक्यात २४ ग्रा.पं.साठी ७६ प्रभागातून १९० सदस्य निवडले जाणार होते. त्यात ३१ सदस्यांसह बेलोना ग्रा. पं. व डोमकचे सरपंच अविरोध झालेत. आता २२ ग्रा. पं.मध्ये सरपंचासाठी ७८, तर सदस्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ७८ उमेदवारांचे भाग्य तालुक्यातील ३१,३५९ मतदार ७८ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावून ठरवतील.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी ३४८ कर्मचारी व ८६ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेने व पारदर्शक होण्याकरिता चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी दिली.

१३ सरंपच, १०३ सदस्यांसाठी मतदान
अंजनगाव सुर्जी | तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले अाहे. निवडणूक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन केंद्रांवर पोहोचले असून, शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील १३ ग्रा. पं.मध्ये १३ सरपंच व १०३ सदस्यांसाठी ही निवडणूक होत असून १५ हजार १०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये ७८८४ पुरुष व ७२१८ महिला मतदार आहे. त्यासाठी ३९ मतदान केंद्रे निश्चित केली अाहेत.़

बातम्या आणखी आहेत...