आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न:25 लाख कॅश, 35 लाखांचे घर पतीने नावाने करून घेतले

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीचे माहेर असलेल्या एका महिलेचे पुण्यातील व्यक्तीसोबत लग्न झाले. लग्नानंतर काही महिने सुरळीत संसार झाल्यानंतर पतीने वेगवेगळ्या माध्यमातून महिलेकडून सुमारे २५ लाख तसेच महिलेने खरेदी केलेले ३५ लाख रुपयांचे घर भूलथापा देऊन स्वत:च्या नावे करून घेतले. तसेच महिलेने सुरू केलेल्या सोशल मीडिया चॅनलवर महिलेविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर दिल्लीतील एका युवकाने प्रसारित केल्याची तक्रार पीडित महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या पतीसह दिल्लीतील युवकाविरुद्ध रविवारी उशिरा रात्री (३१ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.

गौरव ठाकूर (३२, रा. दिल्ली) याच्यासह महिलेचा पती व अन्य दोन महिला असा एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तक्रारीत नमूद केले की, लग्नानंतर पतीने वेगवेगळी कारणे दाखवून व अडचणीत असल्याचे सांगून २५ लाख रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच मी स्वत: खरेदी केलेले घरसुद्धा पतीने भूलथापा देऊन स्वत:च्या नावे करून घेतले. याबाबत पीडित महिलेने तिच्या पतीला विचारणा केली किंवा रक्कम परत मागितली तर पती म्हणायचा, मला खूप टेन्शन आहे, मी आत्महत्या करेल, अशी धमकी द्यायचा. दरम्यान पीडित महिला ही ऑनलाइन कार्यक्रम सादर करायची, त्यासाठी तीने सोशल मीडियावर स्वत: एक चॅनेल सुरू केले होते. याच चॅनेलवर महिलेचे नाव वापरून गौरव ठाकूरने अश्लील व आक्षेपार्ह लिखान केले. तसेच त्याच ठिकाणी महिलेचा मोबाइल क्रमांकही नमूद केला होता. त्यामुळे अनोळखी मोबाइल क्रमांकावरून महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील फोटो आले आहेत. तसेच महिलेची बदनामी केली आहे, असे पीडित महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...