आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:आठ वर्षीय ‘विशेष’ चिमुकल्यावर 25 वर्षीय नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; गुन्हा दाखल करुन आरोपीचा धारणी पोलिसांकडून शोध सुरू

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या आठ वर्षीय ‘विशेष’ बालकावर २५ वर्षीय नराधमाने अनैसर्गिक कृत्य केले. या कृत्यामुळे बालक जखमी झाले आहेत. या प्रकरणी बालकाच्या नातेवाइकांनी नराधमाविरुद्ध धारणी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर हा नराधम पसार झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.१५) उघडकीस आली आहे.

सचिन दीपक भिलावेकर (२५) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित आठ वर्षीय चिमुकला हे विशेष बालक आहे. गावातील नागरिकांना सचिन भिलावेकरच्या घरातून बालकाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला म्हणून नागरिकांनी त्याच्या घरासमोर गर्दी केली.

यावेळी नागरिकांनी सचिनच्या घराचा दरवाजा ठोठावला मात्र त्याने दरवाजा उघडला नाही. मात्र बालकाचा आरेडण्याचा आणि रडण्याचा आवाज वाढल्यामुळे काही वेळानंतर लोकांनी पुन्हा दरवाजा ठोठावला. त्यामुळे सचिनने दरवाजा उघडला. त्यावेळी हा विशेष बालक सचिनच्या घरात होता व तो जोरजोरात रडत होता व तो रक्तबंबाळ झाला होता.

यावेळी नागरिकांना पाहून सचिन भिलावेकर हा पळून गेला. त्याने या चिमुकल्या, विशेष असलेल्या बालकावर अनैसर्गिक कृत्य करुन त्याला चांगलेच रक्तबंबाळ करुन सोडले होते. ही बाब विशेष बालकाच्या कुटुंबीयांना माहीत होताच त्यांनी बालकाच्या दिशेने धाव घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

या प्रकरणी सचिन भिलावेकर या नराधमाविरुद्ध धारणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक कृत्य करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल करुन शोध सुरू केला आहे. मात्र गुरुवारी (दि. १६) सायंकाळपर्यंत हा नराधम पोलिसांना सापडला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...