आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा ऑनलाइन फसवणुकीतील ११ लाखांची रक्कम तसेच मागील काही महिन्यांत विविध ठिकाणांहून हरवलेले ३० लाख ५२ हजार रुपये किमतीचे २५४ मोबाइल मूळ मालकांना शनिवारी पाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते परत करण्यात आले. फसवणूक झालेली रक्कम व मोबाइल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले होते. पोलिस वर्धापन दिवसाचे औचित्य साधून शहर पोलिसांकडून विविध कार्यक्रम सुरू आहे. याच कार्यक्रमादरम्यान शनिवारी सकाळी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात ही रक्कम व मोबाइल परत करण्यात आले.
सायबर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या विविध ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील ११ लाखांची रक्कम उच्च तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून परत मिळवण्यात आली. ही रक्कम तक्रारदारांना परत केली. तसेच हरवलेल्या २५४ मोबाइलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन ते मूळ मालकांना परत करण्यात आले. या वेळी पोलिस उपायुक्त विक्रम साळी व भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही कामगिरी सायबर पोलिस स्टेशनच्या पीआय सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे, एएसआय चैतन्य रोकडे, संजय धंदर, जगदीश पाली, विद्या राऊत, शैलेंद्र अर्डक, गजानन पवार, सुधीर चर्जन, ताहेर अली, पंकज गाडे, प्रशांत मोहोड, संग्राम भोजने, सचिन भोयर, उल्हास टवलारे, गोपाल सोळंखे, मयूर बोरेकर, सुषमा आठवले, गजानन डुबे आदींनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.