आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री सत्तारांचा बळीराजाच्या घरी मुक्काम:साद्राबाडी गावात काढली रात्र; दुसरीकडे हाकेच्या अंतरावर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यांनी एक रात्र चक्क शेतकऱ्याच्या घरी काढली. तर दुसरीकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनिल सूरजलाल ठाकरे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

धारणी तालुक्यातील लाकटू गावात ही घटना घडली. अनिल सूरजलाल ठाकरेला एका वर्षाचा लहान मुलगा असल्याची माहिती आहे. एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमानुसार सत्तार यांनी बुधवारी रात्री अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतकरी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी मुक्काम केला. त्या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

कृषिमंत्र्यांनी एवढ्या साधेपणाने शेतकऱ्याचा पाहुणचार स्वीकारला.
कृषिमंत्र्यांनी एवढ्या साधेपणाने शेतकऱ्याचा पाहुणचार स्वीकारला.

राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या, यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबवणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केला असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

'एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी'

राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, कर्ज व अन्य गोष्टी जवळून जाणून घेणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे या दृष्टीकोनातून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात 'एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी' ही मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.

आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मोहिमेमागचा हेतू

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असून, राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहीमे मागचा हेतू असून राज्यात पुढील 90 दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे.या उपक्रमाचा कालावधी 1 सप्टेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे.

दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ते थेट बांधावर गेले आहेत.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ते थेट बांधावर गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...