आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान‎:अंजनगाव सुर्जी येथे सामाजिक बांधिलकी‎ जोपासत २७२ दात्यांनी केले रक्तदान‎

‎ ‎ अंजनगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुर्जी‎ स्थानिक हजरत टिपू सुलतान मेमोरियल ‎फाउंडेशनतर्फे न. प. उर्दू शाळा क्र. ३‎ मध्ये नुकतेच टिपू सुलतान यांच्य जयंतीनिमित्त टिपू सुलतान सेनेच्या वतीने ‎रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.‎ या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत २७२ दात्यांनी रक्तदान केले.‎ शिबिराचे उद्घाटन उपविभागीय ‎अधिकारी सचिद्र शिंदे, ठाणेदार दीपक ‎वानखडे, तहसीलदार अभिजीत‎ जगताप, मो. शाकीर मो. शरीफ, मो.‎ सोहेल, डॉ. राजीक, डाॅ. शाकिब,‎ मुजफ्फर मास्टर किस्मत अली यांच्या‎ हस्ते करण्यात आले.

दरम्यान‎ शिबिरामध्ये वाढती दात्यांची संख्या‎ पाहता रक्त संकलनासाठी तीन‎ रक्तपेढ्यांचे सहकार्य घेण्यात आले.‎ सकाळी सुरू झालेले शिबिर रात्री‎ उशिरापर्यंत चालले. महिलांनीही‎ स्वयंस्फूर्तीने सहभागी होत रक्तदान‎ केले. शिबिरासाठी स्थानिक डॉक्टरांसह‎ टिपू सुलतान फाउंडेशनचे सदस्य मोईन,‎ मो. सिद्दीक मो. सादीक, डॉ.‎ आयाजुद्दीन, नसीम पैलवान, एतशाम‎ काझी, सलमान बिल्डर, मोईनखान‎ शहनवाज खान, सलीमभाई‎ लेआउटवाले, ईस्माईलभाई, समीर‎ ठेकेदार, फिरोज कुरेशी, मो. दानिश,‎ शोएब अली, मो. मुजाहिद आदींनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...