आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2.16 लाख शेतकऱ्यांना दिलासा:सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी‎ जिल्ह्याला मिळणार 277 कोटी‎ ; आठवडाभरात खात्यात जमा‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी एवढेच‎ नुकसान सततच्या पावसानेही झाले होते.‎ परंतु नियमात तरतूद नसल्याने संबंधित ‎ ‎ शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली‎ नव्हती. अखेर आज, बुधवारी शासनाने ‎ ‎ याबाबतचा अंतिम निर्णय घेतला असून, ‎ ‎ संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे ठरवले‎ आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात‎ जिल्ह्याला २७७ कोटी ५८ लाख ९९ हजार‎ ९१६ रुपयांची मदत मिळणार आहे.

या ‎ ‎ निर्णयामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या २ ‎ ‎ लाख १६ हजार ३०४ शेतकऱ्यांना मोठा‎ दिलासा मिळाला आहे.‎ कृषी सचिवांच्या फेर आढाव्यानंतर ही‎ मदत देण्याचा निर्णय झाला आहे. मदत व‎ पुनर्वसन विभागाने तशी सूचना केली होती.‎ गेल्या पावसाळ्यात अमरावती जिल्ह्यात‎ अतिवृष्टी आणि सततचा पाऊस हा अगदी‎ पाठशिवणीचा खेळ झाला होता. सरकारी‎ नियमानुसार, अतिवृष्टीमुळे (६५‎ मिलीमीटरहून अधिक) झालेल्या‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ नुकसानासाठी मदत देण्याची तरतूद आहे.‎ परंतु सततच्या पावसामुळे झालेल्या शेती‎ नुकसानीबाबत अशी कोणतीही तरतूद नाही.‎ त्यामुळे ही मदत मिळेल की नाही, याबाबत‎ प्रचंड संभ्रम होता.‎

हे आहेत बाधित तालुके‎ सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या‎ तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील तब्बल ११‎ तालुक्यांचा समावेश आहे. कंसातील आकडे‎ हे त्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे आहे.‎ अमरावती (९,९९०), तिवसा (६,१२४),‎ भातकुली (४०,५०४), चांदूर रेल्वे (४,९४३),‎ धामणगाव रेल्वे (४,७०५), नांदगाव खंडेश्वर‎ (७,२३४), दर्यापूर (४८,१८३), अंजनगाव‎ सुर्जी (३१,०६०), अचलपूर (२८,०११), चांदूर‎ बाजार (१०,२५१) व चिखलदरा (१,६११). या‎ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या‎ आठवडाभरात रक्कम जमा होणार असल्याचे‎ जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.‎