आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शिवर येथे कटरने मारहाण करून एकाला जखमी केल्याप्रकरणी तिघांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा दर्यापूर न्यायालयाने ठोठावली असून प्रत्येकी दोन हजारांच्या दंडाची शिक्षादेखील सुणावली आहे. प्रवीण बळवंत वरुडकर (रा. शिवर), सचिन कृष्णराव उदापूरकर व प्रतीक कृष्णराव उदापूरकर दोघेही (रा. पंजाबराव काॅलनी) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवर गावातील प्रेमलाल महादेव नागे याला जुन्या वादावरून आॅक्टोबर २०१८ मध्ये तिघांनी लोखंडी कटरने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी जखमी प्रेमलाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विविध कलमान्वये प्रवीण बळवंत वरुडकर (रा. शिवर), सचिन कृष्णराव उदापूरकर व प्रतीक कृष्णराव उदापूरकर दोघेही रा. पंजाबराव कॉलनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दर्यापूर पोलहस स्टेशनचे तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र येथील प्रथमवर्ग न्यायालयात सादर केले होते. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी योगेश आखरे यांनी पुरावे व सांक्ष तपासून त्या गुन्ह्यांमध्ये नमूद तिन्ही आरोपींना दोषी ठरवून १ वर्षे सक्त कारावासाची शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये सरकारतर्फे अॅड. ए. व्ही. भगत यांनी बांजू मांडली. पोलिसांतर्फे कोर्ट पैरवी पोहेकॉ प्रदीप धोंडे यांनी मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.