आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती वरुड-पांढुर्णा मार्गावर भीषण अपघात:घटनेत 3 ज्योतीषांचा मृत्यू; वरुड तालुक्यातील महेंद्री जंगलाजवळील घटना

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​अमरावती वरुड-पांढुर्णा मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरील झालेल्या अपघातात 3 ज्योतीषांचा मृत्यू झाला आहे. तसेच ही घटना शुक्रवारी महेन्द्री जंगलातील घाट वळणावर घडली. राजेश रामदास शिंदे (45), मनोहर रामराव लांगापूरे (35) आणि किसन शिवनाथ लांगापूर (40, तिघेही रा. अमळापूर, राजूरा) असे मृतकांची नावे आहे.

पहाटे घडली घटना

राजेश शिंदे, मनाेहर लांगापूरे आणि किसन लांगापूरे हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक असून ज्योतिष पाहण्याचे काम करत होते. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ते गावावरुन पांढुर्णा येथे ज्योतिष पाहण्याच्या कामासाठीच मनोहर लांगापूरे यांच्या नव्या कोऱ्या दुचाकीने निघाले होते. दरम्यान वरुडपासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर पुसला ते पांढूर्णा मार्गादरम्यान पंढरी गावापासून जवळच असलेल्या महेन्द्री जंगलातील घाट वळणावर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.

मृतावस्थेत होते पडून

हे तिघे घाट वळणावर असताना विरुध्द दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला चिरडले. यावेळी तिघांपैकी दोघाच्या अंगावरुनच ते वाहन गेल्यामुळे त्यांचे चेहरे छिन्नविछीन्न झाले होते. तर एकाला जबर मार बसल्यामुळे त्याचाही घटनास्थळीच मृ़त्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिंदे यांचे भाऊ नाता शिंदे हे तत्काळ काही नातेवाईकांसह अपघातस्थळी पोहचले मात्र त्यावेळी मृतावस्थेत रस्त्यावर तर रस्त्याच्या कडेला एक जण असे तिघेही पडून होते.

नातेवाईकांनी केला आक्रोष

अपघाताची माहिती मिळताच शेंदूरजना घाटचे ठाणेदार सतिश इंगळे त्यांच्या पथकासह पोहचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी वरुडच्या शासकिय रुग्णालयात आणले. दुपारीच तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन आटोपून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. एकाचवेळी तिन नातेवाईकांचा मृत्यू झाल्यामुळे शिंदे आणि लांगापूरे कुटूंबिय व त्यांच्या नातेवाईकांनी चांगलाच आक्रोष केला होता. या प्रकरणात नाता शिंदे यांच्या तक्रारीवरुन शेंदूरजना घाट पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...