आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जवाहर गेट भागात एसएचडीएनएल (स्वप्नील हाउसिंग डेव्हलपमेंट निधी लिमिटेड) नावाच्या बँकेची शाखा उघडून गुंतवणूकदारांना कमी मुदतीत जास्त रक्कम देण्याचे आमिष दिले. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी या बँकेत रक्कम गुंतवली मात्र त्यांना रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे आठ ते दहा गुंतवणूकदारांनी २९ लाख ८५ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. या तक्रारीवरून खोलापूरी गेट पोलिसांनी तिघांविरुद्ध एमपीआयडीचे कलम ३ (महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ इनव्हेस्टर) नुसार मंगळवारी (दि. ८) गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्नील विजयराव ठाकरे (रा. ल्क्ष्मीश्री अपार्टमेंट आशियाड कॉलनी), प्रशांत अमृतराव पवार (रा. बडनेरा, रेल्वे स्टेशनजवळ) आणि अजिंक्य प्रभाकरराव साबळे (रा. परांजपे कॉलनी, अमरावती) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात गुंतवणूकदार राजेश बबनराव बलखंडे (५७, रा. श्रम साफल्य, कॉलनी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.