आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:रेशनचा 34 क्विंटल तांदूळ पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेला रेशनचा ३४ क्विंटल तांदूळ ग्रामीण पोलिसांनी पकडला. ही कारवाई २ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतून वितरित होणारा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी एका वाहनाने जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी २ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील वहाळा खुर्द बस थांब्याजवळ नाकाबंदी केली. यावेळी तालुक्यांतील बोरीअडगाव येथून येणाऱ्या (एमएच २८ /एबी /३६०१ या क्रमांकाच्या) वाहनाची झडती घेतली असता त्यात ४० हजार ८०० रुपये किमतीचा ३४ क्विंटल तांदूळ आढळला. त्यानंतर पोलिसांनी तांदूळ, तीन लाख रुपये किंमतीचे वाहन, पाच हजार रुपये किंमतीचे मोबाइल असा ३ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ग्रामीणचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात झाली.

बातम्या आणखी आहेत...