आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निराधार’:3.5 लाख निराधार मदतीच्या प्रतीक्षेत; वाढत्या महागाईत उपासमारीची वेळ, शासनाचे दुर्लक्ष

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे बघत चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, तेवढ्याच आतुरतेने जिल्ह्यातील निराधार शासनाकडून केव्हा मदत येते याची वाट बघत आहेत. अडीच महिन्यांपासून शासनाने निधी नसल्यामुळे निराधारांचे अनुदानच दिले नाही. त्यामुळे जगायचे कसे?, पाेटाची खळगी कशी भरायची? असे यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निराधार नागरिकांसाठी दरमहा १ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, जिल्ह्यातील निराधार लाभार्थी मदतीपासून वंचित असल्याने वाढत्या महागाईत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात विविध योजने अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण ३ लाख ५१ हजार २९७ निराधार लाभार्थी आहेत. त्यासाठी ६५ कोटी १५ लाख १५ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाने शासनाकडे केली आहे. ज्यांना मुले, पती, पत्नी, नातेवाइक तसेच इतर कोणाचाही आधार नाही, अशा निराधारांना शासनाकडून दरमहा आर्थिक मदत केली जाते. त्यात कसेबसे हे निराधार दिवस पुढे ढकलत आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना उर्वरित. पान ४ दृष्टिक्षेपात : जिल्ह्यातील निराधार योजना व लाभार्थी संख्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना दिरंगाईमुळे मन:स्ताप होत आहे अडीच महिन्यांपासून बँकेत फेऱ्या मारत आहे. मात्र, श्रावणबाळ योजनेचे अजूनही अनुदान मिळाले नाही. बँकेत गर्दीत उभे राहावे, नंतर नंबर आला की, खाते तपासल्यावर अनुदान जमा झाले नसल्याचे कळते. त्यामुळे मन:स्ताप होतो. अनुदान तत्काळ खात्यात जमा करावे मागणी आहे. भगवान गडलिंग, लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन जगावे की मरावे, ही निराधारांची थट्टा महागाईत जगावे की मरावे तेच कळेनासे झाले आहे. कारण हातात कोणतेही सामान खरेदी करण्यासाठी पैसा नाही. शासनाने निराधारांची थट्टा चालवली आहे. दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही. अशात आम्हाला महागाईचे सर्वाधिक चटक सहन करावे लागत आहेत. -प्रताप पखाले, लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन लाभार्थ्यांना एप्रिलसह मे महिन्याचे अनुदान लवकर मिळणार शासनाकडून एप्रिल व मे या दोन महिन्यांचे अनुदान अद्याप मिळाले नाही. मिळताच लाभार्थ्यांना त्याचे वितरण केले जाईल. मात्र, श्रावणबाळ व संजय गांधी योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गाला अनुक्रमे एक व दोन महिन्यांचे अनुदान मिळाले आहे. -आर. वानखडे, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात लाभार्थ्यांना मदतीचा हात नाही 65595 2687 479 15201 31401 161011 5090 11895 326 59612 351297 एकूण इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन श्रावणबाळ सेवा राज्य नि.वेतन अनुसूचित जमाती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अ.जाती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सर्वसाधारण संजय गांधी निराधार योजना अ. जमाती संजय गांधी निराधार योजना अ. जाती संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण लाभार्थी म्हणतात...

बातम्या आणखी आहेत...