आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशासनाची उदासीनता, आरोग्य विभागाच्या सुस्तपणामुळे कोरोनावर नियंत्रण राहिले नसल्याने ‘कोविड १९’ ची जिल्ह्यात महास्फोटक स्थिती निर्माण झाली अाहे. बुधवारी (दि.१०) ३५९ रुग्णांच्या चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ हजार ८३५ पर्यंत वाढली आहे. बुधवारी शहरातील झेनीथ हाॅस्पिटलमध्ये एका ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या ही ४२७ वर पाेहोचली आहे.
कोरोनाचा आलेख िदवसंेदिवस चांगलाच वर चढत असून, मागील पाच िदवसांत १ हजार १६८ कोरोना बाधितांची नोंद झाली. या आकडेवारीवरून सध्या स्थिती हाताबाहेर गेल्याचे िदसत आहे. नागरिक जुमानण्यास तयार नाहीत. दररोज मोठ्या संख्येत कोरोना रुग्णांमध्ये भर पडत असतानाही शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांमधील गर्दीवर कोणताही परिणाम झाल्याचे िदसत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे काम थंड असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.
जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७८ असून, डबलिंग दर २६६.१ टक्क्यांपर्यंत वाढला मृत्यूचा दर मात्र २ टक्क्यांहून १.८६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बुधवारी २६६ रुग्णांना सुटी झाली त्यामुळे घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या २२ हजार ६३० झाली आहे.
पहिली लस घेतल्यानंतरही १९ आरोग्यसेवक पाॅझिटिव्ह
लस घेतल्यानंतरही १९ आरोग्य सेवक पाॅझिटिव्ह आले असून, आरोग्य विभागाने पहिली लस घेतल्यानंतर रोग प्रतिकार क्षमता पूर्णपणे विकासित होत नसून दुसरी लस घेतल्यानंतरच ती विकसित होते असे सांगून सारवासारव केली आहे. लस घेतल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी पुरेशी काळजी घेतली नसल्यामुळेच ते पाॅझिटिव्ह आल्याची माहितीही आरोग्य विभागाने िदली आहे. लस घेतल्यानंतर विश्रांतीसह त्रिसूत्रीची पालन आवश्यक असताना ते केले जात नसल्यामुळे तसेच आपण लस घेतली आता आपल्याला कोराना होणार नाही, या बिनधास्त भावनेतून ज्यांनी लस घेतली ते वागत असल्यामुळे काही आरोग्यसेवक पाॅझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात हेल्थलाइन व फ्रंटलाइन अशा एकूण १२ हजार ५०० जणांचे आतापर्यंत पहिल्या टप्प्यात लसीकरण झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.