आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूर या ७५ कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम १०८ तासांऐवजी १०६ तासांत अर्थात दोन तास आधीच पूर्ण करून विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात आली. बिटुमिनस काँक्रीटद्वारे तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे एका तासाला ३६० मी. वेगाने काम पूर्ण करण्यात आले.
शुक्रवार ३ जून रोजी स. ७.३० वाजता डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर मंगळवार ७ रोजी सायं. ५.३० वाजता ७५ कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. राजपथ इन्फ्रा प्रा.लि.ने हा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर हा विक्रम अबाधित राहावा म्हणून रात्री ९ वाजेपर्यंत आणखी १५ कि.मी.अर्थात ९० कि.मी. (प्रत्येकी ४५ कि.मी.च्या दोन लेन) डांबरीकरणाचे काम पूर्ण करून या विक्रमात भर घालण्यात आली. या विक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
सलग १०९ तास ३० मिनिटे प्रकल्प व्यवस्थापक, इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर, सुरक्षा अभियंता, सर्व्हेअर, अधिकारी, कर्मचारी व कामगार अशा एकूण ७२८ मनुष्यबळाने झपाटल्याप्रमाणे हे काम पूर्ण केले. अमेरिकेच्या अॅक्युवेदर या संस्थेकडून हवामानाची माहिती घेत ३ ते ७ जून कामासाठी तारख निवडली.
गिनीज बुकमध्ये होणार नोंद
^१०६ तास अखंडित काम करून ७५ कि.मी. रस्ता तयार करण्याचा विश्वविक्रम पूर्ण करण्यात आला. याचेच समाधान वाटते. यावेळी विक्रमाच्या नोंदसाठी गिनीज बुकचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
- विलास ब्राह्मणकर, महाव्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.