आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित:परतवाड्यात 4 तलवारींसह 2 काठ्या जप्त

परतवाडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पेंशनपुरा येथील माँ बिजासन नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्री दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपल्या जात आहे. या वर्षी नवरात्रोत्सवानंतर गुरूवारी (दि. ६) दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक निघाली.

दरम्यान नगर पालिकेच्या कार्यालयाच्या मुख्य मार्गावर रात्री आठच्या सुमारास ही मिरवणूक सुरू असताना काही युवक लाठी-काठी, आगीचे टेंभे, लोखंडी रिंग बाळगून तलवारी फिरवत असल्याची बाब बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या निदिर्शनास येताच त्यांनी तत्काळ कारवाई करत ४ तलवारी व २ काठ्या ताब्यात घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...