आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्था:इर्विन रुग्णालयात 40 आयसीयू, 21 पेडियाट्रिक बेड लवकरच येणार

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णांच्या सोयीसाठी इर्विन रुग्णालयात ४० आयसीयू व २१ पेडियाट्रिक बेड्स येणार आहेत. त्यामुळे येथील बेड्सच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्याला कोविडसाठी मिळालेल्या निधीतून आयसीयू बेड्सची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे देण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) सध्या केवळ ६ आयसीयू बेड्स आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत. आयसीयू बेड्स पुरेसे नसल्यामुळे रुग्णांना नागपूर किंवा अन्य खासगी रुग्णालयांमध्ये पाठवावे लागायचे. परिणामी गरीब रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागायचा. ते बघता आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे लवकरच इर्विनमध्ये रुग्णांसाठी आणखी सुविधा येणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी इर्विन रुग्णालय हे उपचाराचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी जर आरोग्य सुविधा परिपूर्ण नसेल तर रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...