आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथोडीशी जखम झाली आणि रक्त येत असेल आणि ते रक्त अनेक उपायानंतरही थांबत नसेल तर त्वरित सावध होण्याची गरज आहे. तुम्हाला ‘होमोफिलिया’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘हीमोफिलिया’ हा एक आनुवंशिक आजार आहे. या रुग्णांचा अपघात झाल्यास त्यांच्या जीवही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात //"हिमॅटॉलॉजी डे केअर’ सेंटरमध्ये चारशेच्या जवळपास ‘हीमोफिलिया’ आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. यासाठी इर्विन रुग्णालयात ‘हिमॅटॉलॉजी डे केअर सेंटर’ कार्यान्वित आहेत. शरीरामध्ये रक्ताभिसरण सुव्यवस्थित राहण्याकरिता रक्त हे द्रव स्वरुपात असते; परंतु काही जखम झाल्यास रक्त हे शरीराबाहेर वाहते आणि लगेच रक्त गोठून पुढील रक्तस्त्राव थांबतो. हिमोफोलिया आजारामध्ये रक्त गोठण्यासाठी लागणाऱ्या एकूण १३ फॅक्टर पैकी एखादे फॅक्टर शरीरात तयार होत नाही. त्यामुळे रक्त गोठण्याची प्रकिया होत नाही आणि रक्तस्त्राव सुरुच राहतो. हिमोफीलिया हा आनुवंशिक आजार आहे. हा आजार पालकांमध्ये असलेल्या सदोष जनुकांद्वारे आपल्याला होतो. विशेषत: मुलांना होतो. पुरुषात या आजारांची लक्षणे दिसून येतात. पण हा आजार वाहून नेण्याचे कार्य स्त्रियांकडून होत असल्याने या आजाराचे वाहक फक्त स्त्रिया असल्याचे डॉक्टर्स सांगतात.
जर रक्त गोठत नसेल तर जखमेतून रक्तस्त्राव हा सुरुच राहतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्रावामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर हिमोफिलिया रक्तदोषाची शक्यतानाकातून रक्त वाहणे, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेखाली निळसर, काळपट गाठी येणे, सांध्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याने सांधे सुजतात, त्यात वेदना होतात. जखमेतील रक्तस्त्राव न थांबणे ही लक्षणे असतील तर हिमोफिलिया रक्तदोष असण्याची शक्यता असते.
चारशे रुग्णांमध्ये महिलांचाही समावेश
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हिमॅटॉलॉजी डे केअर सेंटर असून याठिकाणी जवळपास ४०० हिमोफोलिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ ते ५ महिला रुग्णदेखील असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
डे केअर युनिटव्दारे रुग्णांवर उपचार
हिमॅटॉलॉजी डे केअर यनिटच्या माध्यमातून हिमोफिलिया आजारग्रस्त रुग्णांचे मोफत उपचार केले जाते. सध्या ४०० रुग्ण हे उपचार घेत आहेत. या रुग्णांना ओळखपत्र, योग्य सल्ला, भौतिकोपचार, समुपदेशन, वैद्यकीय अपंग प्रमाणपत्र, तसेच आवश्यकतेनुसार माेफत एफएफपी व रक्तसंक्रमण करण्यात येते.
-डॉ. विलास जाधव, वैद्यकीय अधिकारी, हिमॅटॉलॉजी विभाग
जिल्हा सामान्य रुग्णालयात होतात माेफत उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये २०१३ पासून हिमॅटॉलॉजी डे केअर सेंटर कार्यान्वित आहे. याठिकाणी हिमोफोलिया रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.