आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थींनींचा सहभाग:रॅलीत शाळांतील 400 विद्यार्थींनींचा सहभाग

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली गुरुवार २२ रोजी काढण्यात आली. त्यात विविध शाळांच्या ४०० पेक्षा अधिक विद्यार्थीनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.विभागीय ग्रंथालयाच्या प्रांगणात माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम देशपांडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक अरविंद ढोणे, निरीक्षक दीपक गेडाम, राजाराम देवकर, धनंजय वानखेडे, रेखा राऊत उपस्थित होते.

ग्रंथालयापासून रॅली इर्विन चौकात आल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे कॅम्प रस्त्यावरून गर्ल्स हायस्कूल चौकातून पुढे सरकत रॅलीचा जि.प. कन्या माध्यमिक शाळेत समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शुभारंभापूर्वी ग्रंथालयाच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात पवार, भाकरे, पवार यांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...