आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिरात 410 किलोचा घंटा; भाविकांचे आकर्षण

तिवसा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात असलेले श्री क्षेत्र धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिरात महाकाय ४१० किलो वजनाचा घंटा आहे. हा घंटा वाजल्यानंतर सुमारे चार ते पाच किलोमीटर परिसरात त्याचा निनाद गुंजतो.वर्धा नदीच्या तिरावर निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर पुरातन आहे. चारशे दहा किलोचा एक महाकाय घंटा या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील सोमवारी येथे भाविकांची प्रंचड गर्दी असते. हे एक हेमांडपंती मंदिर आहे. कालसर्पाची पूजा त्र्यंबकेश्वर प्रमाणेच धामंत्री येथेसुद्धा केल्या जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व असून, पेशवाईच्या काळात म्हणजेच १६०७ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तिवसा येथून १४ किलोमीटर अंतरावर धामंत्री गाव व तेथून या मंदिरापर्यत पोहचण्याचा मार्ग आहे.

९६० मध्ये बसवला घंटा
१९६० मध्ये हा घंटा एका भक्ताच्या इच्छापूर्ती वर देण्यात आला. तब्बल ४१० किलो वजनाचा घंटा जिल्ह्यात किंवा विदर्भात कुठे असल्याचे कोणी सांगत नाही. सध्या ‘‘क’ वर्ग तीर्थस्थळ आहे मात्र शासनाने अश्या पौराणिक स्थळाचे महत्व लक्षात घेता येथे विकासाच्या दृष्टीने पाउले उचलण्यात यावी, अशी मागणी भाविकांची आहे.

बातम्या आणखी आहेत...