आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रहार जनशक्ती:शिक्षक, पदवीधरसाठी ‎प्रहारचे 5 उमेदवार जाहीर‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा‎ माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या‎ मार्गदर्शनात प्रहार शिक्षक संघटना व‎ मेस्टाचे पाचही विभागाचे उमेदवार‎ जाहीर केले आहे. त्यामुळे पदवीधर व‎ शिक्षक मतदार संघात प्रहार पक्षाने‎ उडी घेतली आहे. आगामी ३०‎ जानेवारीला पाच विधानपरिषदेसाठी‎ निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने‎ पूर्व तयारी झाली असल्याचे उमेदवार‎ तथा मेस्टा अध्यक्ष डॉ. संजय तायडे‎ यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.‎ ३० जानेवारीला पदवीधर व‎ शिक्षक मतदार संघासाठी‎ निवडणूक होत आहे. प्रहार‎ जनशक्ती पक्ष देखील प्रथमतः‎ निवडणूक लढवत आहे.

प्रहारचे‎ संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री‎ बच्चू कडू यांनी राज्यात प्रहार‎ शिक्षक संघटना व मेस्टाचे पाचही‎ उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये‎ अमरावती विभाग पदवीधर मतदार‎ संघासाठी किरण चौधरी,‎ मराठवाडा औरंगाबाद शिक्षक‎ मतदान संघ डॉ. संजय तायडे,‎ कोकण विभाग नरेश कोंडा आणि‎ नाशिक विभाग ऍड. प्रा. सुभाष‎ जंगळे असे उमेदवारांची नावे‎ आहेत.

यामध्ये प्रहार दोन तर‎ मेस्टाचे तीन उमेदवार निवडणुकीस‎ उभे आहेत. पाठींबा देण्यात‎ आलेल्या शिक्षक संघटनांमध्ये‎ स्वाभिमानी शिक्षक संघटना,‎ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद,‎ महात्मा फुले शिक्षक परिषद,‎ शिक्षक भारती, शाळा कृती समिती,‎ मराठा क्रांती मोर्चा, शिक्षक‎ समन्वय संघ, मराठवाडा‎ मुख्याध्यापक संघ, जिल्हा परिषद‎ माध्यमिक शिक्षक संघ आदींचा‎ समावेश आहे. यावेळी पत्रकार‎ परिषदेत प्रहार जिल्हाध्यक्ष छोटू‎ महाराज वसू, शहराध्यक्ष बंटी‎ रामटेके, जिल्हा महासचिव शेख‎ अकबर, संपर्क प्रमुख गोलू पाटील‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...