आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे आंदोलन:50 खोके महागाई एकदम ओके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात “५० खोके, महागाई एकदम ओके’आंदोलन केले. वाढत्या महागाईला केवळ केंद्र आणि राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप करत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध फलक उंचावत शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. सोबतच जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र घोषणाबाजी केली.

केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांच्या समस्या व अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सद्यःस्थितीत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना व अंमलबजावणी सुद्धा शासनाकडून केली जात नाही. ही वाढती महागाई नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असतांना शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या जनविरोधी धोरणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात “५० खोके, एकदम ओके “ प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी जनतेच्या समस्या व अडचणी समजून घेऊन दिलासा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली.

आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष निखिल ठाकरे, शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील गावंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आकाश हिवसे, अनिकेत मेश्राम, हेमंत बोबडे,अक्षय पळसकर, अनुप गावंडे, संकेत बोके, राहुल वाघ, श्रवण लुंगे, अभिषेक बोके, निखिल पुनसे, आकाश थोरात, अभिजीत कांबळे, वैभव तिडके, फिरोज शाह, मोईन खान, सागर इंगळे, अक्षय महल्ले, दिग्विजय गायगोले, प्रतीक भोकरे, प्रथमेश ठाकरे, गौतम बागडे, भूषण मोहोड आदी उपस्थित होते.

शासन बुजगावण्यासारखे उभे
गेल्या काही वर्षांत केंद्र त्यानंतर आता विद्यमान राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला वेशीला टांगले आहे. वाढती महागाई, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिक व युवा वर्गाचे कंबरडे मोडले आहे. मात्र, दुसरीकडे शासन बुजगावण्यासारखे उभे आहेत.निखिल ठाकरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...