आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविभागातील 104 एसटी बस एक्स्पायर झाल्याने गत दोन वर्षांपासून लांब पल्ल्याच्या २१ आणि मध्यम पल्ल्याच्या 29 बस फेऱ्या अशा एकूण 50 फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. परिणामी, दिवसाला 15 हजार किलोमीटर प्रवास कमी झाला आहे.
त्यामुळे एसटीला दिवसाकाठी साडेचार लाख रुपये आणि महिन्याकाठी सुमारे १ कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. अमरावती विभागाने एसटी महामंडळाकडे १०० नवीन बसची मागणी केली आहे. त्यापैकी २० बस आगामी काही दिवसांत मिळणार असल्या तरी आजघडीला ज्या बस आहेत. त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. त्यापैकी काही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अमरावतीला विभागात नवीन बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे एसटीमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून एसटीने विभागातील एसटी फेऱ्या कायम ठेवल्या असल्या तरी लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्याने लांबवर प्रवास करणारे प्रवासी सध्या त्रस्त आहेत. सध्या अमरावती विभागात ४५ शिवशाही अन् हिरकणी आहेत. त्यांच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी अमरावती विभागाकडे ४६५ बस होत्या. त्यापैकी १०४ बस निर्लेखित केल्या. ३६१ बस एकाच वेळी रस्त्यावर धावत नाहीत.
एसटीला आर्थिक फटका बसतोय एसटी बस कमी झाल्यामुळे लांब व मध्यम पल्ल्याच्या बसच्या फेऱ्या या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे दिवसाला सुमारे साडेचार लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक.
२० ते ३० रुपये प्रतिकिमी प्रवासभाडे
लांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या बससाठी २० ते ३० रुपये प्रति किलोमीटर भाड्याखाली जाते; परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव फेच्या ५० टक्के घटल्याने साहजिकच उत्पन्नातही घट झाली आहे. २० ते ३० रुपये किमी दराने एसटीचे दररोज ४ लाख ५० हजारांचे, तर महिन्याला सुमारे १ कोटी लाखांचे उत्पन्न बुडत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.