आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक मदत:अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार आर्थिक मदत द्या

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेती खरडून गेल्याने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. जिल्ह्यात अति पावसामुळे हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे, तसेच पुरामुळे घरांचीही पडझड झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हवालदिल झाला आहे. शेती खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेतातील कुंपणे, विहिरी खचल्या आहेत. अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे मानवाधिकार परिषदेचे म्हणणे आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...