आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृती स्थिर:अचलपुरात अन्नातून 52 जणांना विषबाधा ; सर्वांनी दोन दिवसांपूर्वी साक्षगंधात केले होते जेवण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूरात दोन दिवसांपुर्वी एका ठिकाणी साक्षगंधाचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमात जेवण केलेल्या व्यक्तींपैकी ५२ जणांना पोटदुखी व अन्य त्रास झाल्यामुळे रविवारी (दि. ४) सायंकाळी त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे.

अचलपुरातील जीवनपुरा परिसरात दोन दिवसांपूर्वी साक्षगंधाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जेवण केलेल्या व्यक्तींपैकी अनेकांना रविवारी सकाळपासून पोटदुखी, ताप, अंगदुखी, मळमळ होणे, उलट्या होणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे एका मागोमाग एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत गेले. रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत रुग्णालयात ५२ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. रुग्णांची संख्या अजूनही वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. आतापर्यंत उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये आठ बालकांचा समावेश असून उर्वरित स्त्रिया व पुरुष आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे मात्र त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवणे गरजेचे असल्यामुळे दाखल करून घेण्यात आले आहे, अशी माहिती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण मुरले यांनी ‘दिव्य मराठी शी बोलताना दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...