आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेरा नवीवस्ती परिसरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड अडकले होते. त्यावेळी मागे असलेल्या अनोळखी व्यक्तीने मी काढून देतो, असे म्हणून त्यांना एटीएम कार्ड दिले. त्यानंतर दोन दिवसात त्यांच्या खात्यातून ५२ हजार रुपये काढून त्या व्यक्तीची फसवणूक केली. अशोक श्रावण डोंगरे (रा. पवननगर, अमरावती) असे तक्रारदारांचे नाव आहे. अशोक डोंगरे हे २ एप्रिलला नववीवस्ती परिसरातील चांदणी चौकात असलेल्या एका एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले.
त्यावेळी त्यांनी १० हजार रुपये काढले मात्र मशिनमधून त्यांचे एटीएम कार्ड बाहेर निघत नव्हते. त्याचवेळी एमटीएमवर त्यांच्या मागे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना एटीएम कार्ड दिले. ते कार्ड घेऊन डोंगरे घरी गेले. त्यानंतर मात्र त्यांच्या खात्यातून चार वेळा रक्कम काढण्यात आली असून, एकूण ५२ हजारांची रक्कम कमी झाली. त्यामुळे त्या अनोळखी व्यक्तीने परस्पर रक्कम काढून आपली फसवणूक केल्याचे डोंगरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सोमवारी (दि. ३) बडनेरा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.