आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशीम जिल्ह्यातील मलकापूर येथे पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या घरी सोमवारी (दि. १२) पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आलमारीचे कुलूप तोडून सहा लाखांची चोरी केली. यावेळी चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ६३ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना नांदगाव पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत शहरातील देशमुख लॉन परिसरातील अनुराधा कॉलनी येथे घडली.
स्मिता मनोहरराव ढोके (रा. अनुराधा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य घराच्या वरच्या मजल्यावर झोपले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि आलमारी मध्ये असलेले १५६ ग्रॅम सोने किंमत अंदाजे ५ लाख ४६ हजार, चांदीचे २१०० रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड ६३ हजार १०० रुपये असा एकूण ६ लाख ९ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली.
याच परिसरात अन्य एका घरातही चोरी
चोरट्यांनी याच परिसरातील मंदा राऊत यांच्या घरात चोरी केली आहे. त्या ठिकाणाहून दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने आणि १०० रुपये रोख असा २१०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.