आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे रुग्ण नोंद:कोरोनाचे 6 नवे रुग्ण, दोघांना सुटी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण नोंदवले गेले. विविध तपासणी प्रयोगशाळांच्या अहवालानुसार, ही संख्या प्राप्त झाली असून दोघांना सुटी मिळ‌ाली आहे. दरम्यान, आजच्या नव्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२ पर्यंत घटली असून, एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ४९ वर पोहोचली आहे. दुसरीकडे सुटी घेऊन घरी गेलेल्यांचा आकडा १ लाख ५ हजार ४०९ वर पोहोचला आहे.

यामध्ये आज घरी गेलेल्या दोन व्यक्तींचाही समावेश आहे. वैद्यकीय अहवालातील नोंदीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५९६ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्याचवेळी इतर जिल्ह्यातून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेल्या ३२ जणांनाही या आजारामुळे प्राण गमवावे लागले.

बातम्या आणखी आहेत...