आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:मजीप्रा कडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम 30 तासात 60 टक्के पूर्ण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्परवर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी रविवारी फुटली आहे. त्यामुळे बडनेरा व अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. दरम्यान रविवारी दुपारी २ वाजतापासून सुरू झालेले दुरुस्तीचे काम सोमवारी रात्री ८ पर्यंत म्हणजेच मागील ३० तासांत ६० टक्के पूर्ण झाले. ६ डिसेंबरला रात्रीपर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण होऊन काही भागात पाणीपुरवठा होण्याची शक्यता मजीप्रा सूत्रांनी वर्तवली आहे.

नागपूर महामार्गावरील बोरगाव धर्माळेनजीक मुख्य जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी सिमेंट काँक्रीटची असून जुनी झाल्यामुळे वारंवार त्या वाहिनीमध्ये लिकेज होत आहेत. दरम्यान मागील ३० तासांपासून तंत्रज्ञ व मजीप्राचे कर्मचारी, अधिकारी अशी २३ जणांची टीम दुरुस्ती कामात व्यस्त आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटलेली आहे, त्या ठिकाण नव्याने लोखंडी टाकण्याचे काम सुरू आहे.

दिवस-रात्र काम सुरू आहे
आतापर्यंत सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून मंगळवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यामुळे बुधवारी सायंकाळी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.-अजय लोखंडे, उपकार्यकारी अभियंता, मजीप्रा.

बातम्या आणखी आहेत...