आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरवाढी विरोधात आंदोलनांमुळे ४० टक्के सामान्य कराला शासनाकडून स्थगिती मिळाली तरी स्वच्छता कराचे प्रत्येकी ६०० रु. कायम आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर वसूल होत असतानाही आधीच्या तुलनेत शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात सर्वत्र कचरा दिसत असल्यामुळे याविराेधात बुधवार १२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने मनपात धडक दिली. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही राकाँ शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहरद्वारे उपायुक्त डाॅ. मेघना वासनकर यांना देण्यात आले. शहरात स्वच्छतेची कामे करण्यात यावी. कचरा संकलनासाठी घंटागाड्या नियमित फिरविण्यात याव्यात, स्वच्छता कराचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी माजी सभापती अविनाश मार्डीकर, प्रशांत महल्ले, रतन डेंडूले, जितेंद्र ठाकूर, सपना ठाकूर, संदीप आवारे, मनोज केवले, प्रमोद महल्ले, महेंद्र भुतडा, श्रीकांत झंवर, योगेश सवाई, संदीप कदम यांची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.