आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची फसवणूक:शेतकऱ्यांकडून तीन गावातून ताब्यात घेतले माती मिश्रित खतांचे 65 पोते

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे दीड महिन्यांपूर्वी कृषी विभागाने माधान व खार तळेगाव येथून काही शेतकऱ्यांकडून माती मिश्रीत खत ताब्यात घेतले होते. जिल्ह्यातील काही ठगबाजांनी माती मिश्रित खताची घरपोच विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात चार ठकबाजांना पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीत अजूनही काही शेतकऱ्यांना खत विकल्याचे सांगितले होते. त्यामुळे कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ३) रात्रीपर्यंत तीन गावातून ६५ बॅग मातीमिश्रित खत शेतकऱ्यांकडून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी अटक केल्यानंतर ठकबाजांनी जिल्ह्यात कोणकोणत्या गावात शेतकऱ्यांना मातीमिश्रित खत विकले ही कबूली दिली होती. त्या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी दर्यापूर तालुक्यातील मार्कंडा येथून ४० तर वंडली येथून १० बॅग तसेच अमरावती तालुक्यातील शिराळा येथून १५ बॅग अशा एकूण ६५ बॅग शेतकऱ्यांकडून ताब्यात घेतल्या आहेत.

वंडली येथे तर १०० बॅग विक्री केल्या होत्या, त्यापैकी ९० बॅग शेतकऱ्यांनी वापरल्या आहेत. मात्र ठकबाजांना पकडल्यानंतर त्यांनी बनावट खताची विक्री थांबवली होती. शेतकऱ्यांनी या बनावट खताचा वापर करु नये, म्हणून शेतकऱ्यांकडून हे खत आता ताब्यात घेतले असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख यांनी सांगितले.

ही चौकडी स्वत:च खत निर्मीती करुन बाजार भावापेक्षा एका बॅगवर २०० रुपये कमी घेवून शेतकऱ्यांना घरपोच विक्री करत होते. नामांकीत कंपनीच्या प्लास्टिक पिशव्यांमधून खत विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना ते खरे वाटत होते मात्र ही बनवेगिरी असल्याचे कृषी व पोलिस विभागाच्या कारवाईतून समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...